Banner Image

वर्तमान – २०००

सन २०१० - शाहरुखखान नेरोलॅकचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.२००६ - जीएनपीएलचे नामकरण कन्साई नेरोलॅक असे करण्यात आले२००४ ते २००६ - लोटे आणि जैनपूर येथील कारखान्यांना अनुक्रमे ग्रीनटेक सुरक्षा सुवर्ण आणि रौप्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या कारखान्यांना OHSAS18001 प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त झाले. नरोलॅक ब्रँडवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्री. अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन करण्यात आले. वंचित मुलांना मदत करण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनच्या सहयोगाने उपक्रम सुरू करण्यात आले.

Banner Image

२०००-१९९१

सन २००० पर्यंत कन्साईन पेंट्सने फोर्ब्स गोकाक आणि त्यांच्या सहयोगींच्या हिश्श्याचे संपादन केले आणि ही कंपनी १९९९साली कन्साई पेंट्सची उपकंपनी झाली. या कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी आता कन्साई पेंट्सचा हिस्सा ६४.५२% आहे. ‘जब घर की रौनक बढानी हो’ ही नेरोलॅक जिंगल लोकप्रिय झाली.

Banner Image

१९९०-१९८१

८३ साली नेरोलॅकने मुंबईआणि पुण्यात GNP101 ऑटो पेंट्स सुरू केले. यात २४ मूलभूत रंगछटांची रेंज, मेटॅलिक रेंजमधील १२ रंगछटा आणि व्हायब्रंट रेंजमधील १२ रंगछटा समाविष्ट होत्या. ऑटोमोटिव्ह उत्पादनांसाठी कॅथॉडिक इलेक्ट्रोडपोझिशन प्रायमर आणि इतर अत्याधुनिक कोटिंगसाठी जीएनपीएलनेजपानमधील कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड यांच्याशी ओसाका येथे १९८६ साली टीएएवर स्वाक्षरीकेली. भारतात हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी जीएनपीएल ही पहिली कंपनी होती.

Banner Image

१९८०-१९५०

१९७० साली गुडी हा हसणारा वाघ कंपनीचा मॅस्कॉट म्हणून सादर करण्यात आला. १९५७ साली कंपनीचे नाव बदलून गुडलास नेरोलॅक पेंट्स प्रा. लि. असे ठेवण्यात आले. कंपनीच्या सर्वात यशस्वी उत्पादनाचे नाव कंपनीच्या ब्रँड नावात समाविष्ट करणे उचित ठरेल , हा या नावबदलामागील विचार होता. १९६८ साली ही कंपनी पब्लिक (सार्वजनिक) झाली आणि प्रायव्हेट हा शब्द वगळण्यात आला. १९५०च्या दशकात लष्करी साधनांमध्ये वापरण्यात येणारे अँटि-गॅस वॉर्निश हे कंपनीचे सर्वात लोकप्रिय उत्पादन होते.

Banner Image

१९२० च्या दशकाची सुरुवातनोव्हेंबर

१९३० मध्ये तीन ब्रिटिश कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन गुडलास वॉल अँड लीड इंडस्ट्रीज ग्रुपलि. स्थापन झाली. त्यानंतर ही कंपनी लीड इंडस्ट्रीज ग्रुप (एलआयजी) लि. झाली. एप्रिल १९३३ मध्ये एलआयजी, लिव्हरपूल, इंग्लंडने कंपनीचे संपादन केले आणि गुडलास वॉल (इंडिया) लि.,असे नामकरण केले. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला अॅलेन ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड या इंग्लिश कंपनीने अमेरिकी पेंट अँड वॉर्निश कंपनी विकत घेतली आणि ती गहागन पेंट्स अँड वॉर्निश कं. लि. झाली.

भाषा

आमच्याबद्दल

१९२० साली मुंबईतील लोअर परळ भागात गहागन पेंट्स अँड वॉर्निश अस्तित्वात आली. शतकभरानंतरही ही पेंट कंपनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पेंट कंपनी हे बिरुद मिरवत आहे आणि या क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून या कंपनीचा ओळख आहे. 

मग, तुलनेने छोट्या असलेल्या या कंपनीला कन्साई नेरोलॅकसारखी बडी कंपनी होण्यासाठी काय आवश्यक होते?

यासाठी कष्ट आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते. यासाठी समर्पण आणि साहस लागते. यासाठी निर्भीड नावीन्यतेसह पुढे चालत राहावे लागते. जोखीम पत्करावी लागते आणि जेव्हा त्या कार्याला यश मिळते तेव्हा ते यश साजरे करावे लागते. आणि जेव्हा जोखीम घेऊन केलेल्या कार्याला अपयश येते, तेव्हा पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. नवनवे प्रयोग करण्याबरोबर ग्राहकांच्या जाणीवांशी एकरूप व्हावे लागते. यासाठी संशोधन व विकास, तंत्रज्ञान आणि तुमच्या मनुष्यबळात गुंतवणूक करावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी उत्पादनावर अढळ विश्वास आणि अविचल निर्धार असणे आवश्यक आहे.

या सगळ्यांमुळेच कन्साई नेरोलॅक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कोटिंग कंपनी आहे आणि इंडस्ट्रिअल कोटिंगमध्ये मार्केट लीडर आहे.

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा