भाषा

ऑटोमोटिव्ह पेंट

परिचय

कन्साई नेरोलॅक उत्पादनांची व्यापक श्रेणी उपलब्ध करून देते आणि त्यासोबतच  वाहन ओईएम्स आणि घटक साहित्य पुरवठादारांच्या विशिष्ट गरजांप्रमाणे तांत्रिक सहाय्य आणि सेवाही देते. सर्व उत्पादने वर्तमानातील जागतिक ट्रेंड्सचा विचार करून उत्पादित केली जातात

 

उत्पादनांची रेंज

जागतिक ऑटोमोटिव्ह ग्राहकांच्या पर्यावरणविषयक कठोर मानकांची पूर्तता करण्यासाठी ऑटोमोटिव्ह कोटिंगमधून एसओसी काढून टाकण्याचा उपक्रम कन्साई नेरोलॅकने भारतात सर्वप्रथम सुरू केला.

उत्पादनांची यादी खाली दिलेली आहे. मात्र, ही यादी सर्वसमावेशक नाही. कारण, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारी नवनवीन उत्पादने आम्ही सतत विकसित करत असतो

जपानमधील कन्साई पेंट्स कंपनीने सीईडीसारख्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे संशोधन केले आहे. गेल्या काही वर्षांत किंमत, दर्जा आणि जगभरातील पर्यावरणासंदर्भातील नियम यांची पूर्तता करण्यासाठी हे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत राहिले आहे

कन्साईचे सर्वांत नवीन उत्पादन सध्या तरी सर्वांत अनुकूल असे आहे. मात्र, भविष्यकाळातही अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पुरवण्यासाठी संशोधन सतत सुरू आहे

हे उत्पादन एका उत्कृष्ट आणि गुळगुळीत फिल्मसारखे दिसणारे कोटिंग देते आणि थ्री वेट कोटिंग सिस्टम्ससाठी ते खास विकसित करण्यात आले आहे. डीएफटीच्या (ड्राय फिल्म थिकनेस) एकसारख्या वितरणासाठी हे उत्पादन डिझाइन करण्यात आले असून अत्युच्च क्षमतेच्या कामगिरीसह प्रति एकक किंमतही कमी होऊ शकेल या दृष्टीने ते तयार करण्यात आले आहे.

ऊर्जेवरील खर्च कमी होऊन उत्पादकता वाढावी या हेतूने हे उत्पादन कमी डिपॉझिशन वेळ जिथे असतो तिथे (१२०”, सामान्य काळ १८०”) वापरण्याजोगे आहे आणि याचा बेकिंग कालावधी व तापमानही (१६० अंश सेल्सिअसx१०’, सामान्य कालावधी व तापमान १७५ अंश सेल्सिअस x १५’) कमी आहे.

ई-कोटमध्ये धातूच्या सब्सट्रेटला अॅक्विअस बाथ सोल्यूशनमध्ये बुडवून, विजेच्या प्रभावाखाली चार्ज्ड ऑरगॅनिक प्रायमरने कोट दिला जातो.

ई-कोटचे विशिष्ट लाभ पुढीलप्रमाणे आहेत: पिनहोल्स किंवा पृष्ठभागावर अन्य दोष निर्माण न होता एकसारखे आच्छादन, याचा परिणाम म्हणून रंग कमी वापरला जातो; कडांचे अधिक चांगले संरक्षण, परिणामी अधिक चांगले गंजरोधन; बॉक्स-सेक्शन्ससारख्या सुटलेल्या भागांनाही कोट करणे इत्यादी. ही एक सिंगल कोट पाण्यावर आधारित पर्यावरणस्नेही कोटिंग प्रणाली आहे. ई-कोट प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असून यासाठी मनुष्यबळ कमी लागते आणि रंगाच्या रिकव्हरीचे प्रमाण (अल्ट्रा फिल्ट्रेट आणि रिव्हर्स ऑसमोसिस प्रणाली असेल तर ९९.५ टक्क्यांपर्यंत) उच्च असल्याने वाजवी खर्चा प्रक्रिया पूर्ण होते

 

उत्पादनांची रेंज

सीईडीमध्ये आमच्या उत्पादनांची श्रेणीही समाविष्ट आहे:

  • लेडमुक्त पॉलीब्यूटाडाइन आधारित अॅनोडिक इलेक्ट्रो-डिपॉझिशन प्रायमर (एईडी)
  • एपॉक्सी रेझिन आधारित कॅथोडिक इलेक्ट्रो-डिपॉझिशन प्रायमर (सीईडी)
  • अॅक्रिलिक रेझिन आधारित केथॉडिक इलेक्ट्रो-डिपॉझिशन प्रायमर (एसीईडी)

मोटरसायकलच्या फ्रेमच्या कोटिंगसाठी सिंगल-कोट उपयोजन प्रणाली वापरणारे जगातील पहिले उत्पादन म्हणून एसीईडी या उत्पादनाने नावीन्यता पुरस्कार प्राप्त केला.

आमच्या सीईडीमध्ये अवजड धातू नाहीत आणि ऑटोमोटिव्ह उद्योगातील पर्यावरणाच्या कठोर नियमांची पूर्तता हे उत्पादन करते

प्रायमर सरफेसर हा दुसरा कार्यात्मक स्तर आहे आणि तो ई-कोट आणि टॉपकोट्स यांच्यातील मध्यवर्ती कोट म्हणून काम करतो. तो उत्कृष्ट स्टोन चिप (रस्त्यावरील डेब्रिस, खडे इत्यादी) संरक्षण तसेच ई-कोट फिल्मला यूव्ही किरणांपासूनही संरक्षण पुरवतो. इंटरमिजिएट कोट्स पांढऱ्या, फिकट करड्या, गडद करड्या, लाल, निळ्या आणि ओई उत्पादकांच्या आवश्यकतेनुसार आणखी काही विशिष्ट रंगांमध्ये उपलब्ध आहेत. जलजन्य (पाण्यात) बुडवण्याचे प्रायमर्स हे पर्यावरणाची सुरक्षितता डोळ्यापुढे ठेवून विकसित केले जातात

कन्साई नेरोलॅक काही विशेष इंटरमिजिएट कोट्सही तयार करते, उदाहरणार्थ, अॅण्टि चिप प्रायमर, नॉन सेंडिंग प्रायमर आणि वेट ऑन वे प्रायमर इत्यादी

ऑटोमोटिव्ह्जमधील कोटिंग प्रणालीला रंग, सौंदर्य आणि हवामानापासून संरक्षण देण्याचे काम टॉप कोट्स करतात. कन्साई नेरोलॅक ग्राहकांनी दिलेल्या विशिष्ट तपशिलांनुसार रेझिन्सवर आधारित विविध टॉप कोट्सच्या मोठ्या श्रेणीचे उत्पादन करते. रंगीत आणि प्रभावी पिगमेंट्स मिसळल्यामुळे एक दृश्य प्रतिमा तयार करण्यात हे उत्पादन महत्त्वाची भूमिका बजावते. या विभागात सॉलिड रंग आणि मेटॅलिक पेंट फिनिश यांच्यात एक सामान्य फरकाची रेषा निश्चित करता येते. मेटॅलिक आणि मायका फिनिशेसचे विविध प्रकार उपलब्ध आहेत

टॉप कोट्समध्ये थ्री वेट कोटिंग प्रणालीसारखे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अनेक ग्राहक उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत.

क्लिअर कोट हा पेंट प्रणालातील सर्वांत वरचा स्तर असून, तो सूर्यप्रकाश आणि हवामानातील अन्य घटकांपासून तसेच रसायने व पक्ष्यांच्या घाणीसारख्या जैविक घटकांपर्यत सर्वांपासून संरक्षण पुरवतो. कोटिंग प्रणालीला एक ओरखडे रोधक अंतिम स्पर्श देण्यात हा मदत करतो. कन्साई नेरोलॅक विविध कार्यात्मक उपयोग असलेले क्लिअर कोट्स देऊ करते, उदाहरणार्थ, ओरखडे प्रतिबंधक, आम्ल आणि अल्कलीरोधक, यूव्हीरोधक, आघातरोधक वगैरे

कन्साई नेरोलॅक निरनिराळ्या प्रकारचे टच पेंट्स तयार करते. मुख्य पेंटच्या वरील स्तराचे काही नुकसान झाल्यास लहान-मोठे टच-अप देण्यासाठी यांच्या उपयोग मुख्यत्वे होतो. कन्साई नेरोलॅक ऑटो रिफिनिश उत्पादनांची एक संपूर्ण श्रेणीही तयार करते. या उत्पादनांचा वापर गॅरेजमध्ये वगैरे दुरुस्तीदरम्यान कोटिंगसाठी होतो

मोटरसायकलच्या मफरलच्या (सायलेन्सर) आतील व बाहेरील पृष्ठभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या उष्णतारोधक पेंट्सची निर्मिती कन्साई नेरोलॅक करते. ६०० अंश सेल्सिअसपर्यंत उच्च तापमान सहन करू शकणारे पेंट्स तयार केले जातात. 

प्रवासादरम्यान ऑटोमोटिव्ह वाहनांना दिलेल्या रंगाच्या वरील स्तराचे धूळ, रसायने, पक्ष्यांची घाण आणि अन्य हानीपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपगार्ड ट्रांझिट प्रोटेक्शन फिल्मचा पुरवठाही कन्साई नेरोलॅक करते. धातू व प्लास्टिकच्या पृष्ठभागाच्या संरक्षणासाठी फिल्म्स उपलब्ध आहेत. 

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा