भाषा

रंग संशोधन आणि विकास

कन्साई नेरोलॅकचे सुसज्ज संशोधन आणि विकास केंद्र मुंबईतील लोअर परळ येथे आहे. याला जपानमधील कन्साई पेंट कंपनीचे पाठबळ आहे. ओईएम उद्योगाची सतत वाढत जाणारी रंगछटा आणि फिनिशेसची गरज ती पूर्ण करते. कन्साई नेरोलॅकचा कलर डेव्हलपमेंट सेल ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी रंग सादरीकरणे आयोजित करतो. त्यानंतर रंगांच्या विकासापासून ते त्यांना मानकाची पूर्तता करण्याइतके सक्षम करण्यासाठी एका कठोर प्रक्रियेतून जाऊन ग्राहकांच्या सूचनांचे पालन केले जाते. 

ऑटोमोटिव्ह ग्राहकांच्या स्टायलिंग आणि मार्केटिंग विभागांसोबत जोडून घेण्यासाठी नियमित उपक्रम असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून नवीन मॉडेल्ससाठी नवीन रंगछटा आणण्यावर सातत्याने काम केले जाते आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार सध्या अस्तित्वात असलेल्या मॉडेल्सना नवे रूप दिले जाते

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा