भाषा

लावण्याबाबतचा तपशील

Application Details

पृष्ठभागाची स्थिती आणि तयारी, जोड व खाचा भरणे

फ्लोअर कोटिंग सिस्टिमच्या यशाची पातळी आणि टिकाऊपणा जमिनीची स्थिती आणि पृष्ठभागाच्या तयारी यावर अवलंबून असतो.

फ्लोअर कोटिंग प्रणालीचे यश आणि टिकाऊपणा अवलंबून असतो तो मुख्यत्वे फरशीच्या प्रचलित स्थितीवर आणि पृष्ठभाग कसा तयार केला जातो यावर.

सबस्ट्रेट आणि फ्लोअरिंग प्रणाली एकमेकांना धरून राहावेत यासाठी एक मजूबत, स्वच्छ आणि कोरडा काँक्रीटचा सबस्ट्रेट अत्यावश्यक आहे. काँक्रीटची नवीन पृष्ठभाग किमान २० दिवसांपूर्वी तयार केलेला असावा, क्युरिंग मिश्रणे आणि सीलर्सपासून तो पूर्णपणे मुक्त हवा, आर्द्रता व बाष्पापासून पूर्णपूणे मुक्त हवा आणि प्रायमर लावण्यापूर्वी त्यातील आर्द्रतेचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी हवे. जुना काँक्रीट पृष्ठभाग ओलावा आणि आर्द्रतेपासून तर मुक्त हवाच, शिवाय तेलाचे खोलपर्यंत झालेले प्रदूषण आणि थर्मोप्लास्टिकपासूनही मुक्त असला पाहिजे. 

फरशीवरील तेलकट घटक काढून टाकण्यासाठी रासायनिक/सॉल्व्हंटने स्वच्छता करणे किंवा फ्लेम क्लीनिंग केले जाते. यामुळे पृष्ठभाग तेलकटपणापासून मुक्त होऊन प्रायमर कोट लावण्यास अनुकूल होतो. मात्र, पेंट प्रणाली सुचवण्यापूर्वी तसेच वापरण्यापूर्वी अशा तेलकट फरशीची पूर्ण तपासणी होणे आवश्यक आहे. 

प्रायमर कोट: पृष्ठभाग धुळीपासून मुक्त आहे याची खात्री करून घ्या, पृष्ठभाग घासून वाळू द्या आणि मग अशा पद्धतीने तयार झालेल्या पृष्ठभागावर एपॉक्सी प्रायमरचा पहिला कोट द्या आणि मग तो वाळू द्या.

एपॉक्सी स्क्रीड थर: प्रायमर कोट वाळला की फ्लोअर पेंट प्रणालीत सांगितल्याप्रमाणे आवश्यक जाडीचा एपॉक्सी स्क्रीड थर दिला जातो.

सॉफ्ट ग्राइंडिंग: पृष्ठभाग गुळगुळीत आणि समतल व्हावा म्हणून आवश्यक अशी सॉफ्ट ग्राइंडिंग प्रक्रिया पूर्ण केली जाते. यामुळे स्क्रीड थरातील सैल पडलेले घटक काढून टाकले जातात आणि टॉपकोट अधिक सफाईदार होतो.

सीलर कोट किंवा टॉप कोट: फरशी सॉफ्ट ग्राइंड झाली आणि स्वच्छ करण्यात आली (ग्राइंडिंगदरम्यान जमलेली धूळ स्वच्छ करणे) की, सीलर कोट किंवा सांगितलेल्या जाडीचा अखेरचा टॉपकोट दिला जातो. त्यानंतर किमान २४ तास पृष्ठभाग वाळू दिला जातो.

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा