भाषा

अॅप्लिकेशन मार्गदर्शन

 • खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये पेंटिंग करू नये
 • वातावरणातील तापमान 50 Cहून कमी असताना
 •  वातावरणातील तापमान ड्यू पॉइंटवर ३०Cहून कमी असताना
 •  सापेक्ष आर्द्रता 85% हून अधिक असेल तर
 • पेंटिंगपूर्वी पृष्ठभाग ओला केला गेला असेल तर
 • पृष्ठभागाचे तापमान 500Cहून अधिक असेल तर

पेंट्स आणि थिनर्स तपासणे
 उपलब्ध पेंट्स आणि थिनर, तपशिलांमध्ये दिलेल्या वर्णनाप्रमाणे आहेत की नाही हे तपासणे

मिक्सिंग
 यांत्रिक स्टरर किंवा पेडल मिक्सर वापरून विशिष्ट प्रमाणात पेंटचे सर्व घटक मिसळा. पेंटचे मिश्रण एकसमान व्हावे म्हणून त्याला पुरेसे हलवून घ्या.

थिनिंग

कधीकधी तापमानात झालेल्या बदलानुसार, पेंटची कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्याला पातळ करणे किंवा थिनिंग करण्याची आवश्यकता भासते. अतिरिक्त पातळ झाल्यास रंगाचा पापुद्रा बिघडू शकतो आणि त्याची लपवण्याची क्षमता कमी होऊ शकते, हे लक्षात ठेवावे.

फिल्टरिंग
 जर पेंटमध्ये स्किनचे छोटे तुकड़े किंवा छोट्या गाठी असतील, तर त्याला कापडाच्या गाळणीने किंवा 60-100 मॅशवाल्या तारेच्या गाळण्याने गाळून घेतले पाहिजे. 

पॉट लाइफ
 स्वतंत्र कंटनेर्समध्ये पुरवठा केल्या गेलेल्या पेंटचे दोन किंवा तीन घटक एकत्र केल्यानंतर, दिलेल्या मुदतीमध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे.  

 पुढील कोट लावण्यासाठी ठेवण्याचा अवधी
 पेंटचा पुढील कोट देण्यापूर्वी उत्पादकाने दिलेल्या सूचनेनुसार वाळण्यासाठी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे.  

कोरड्या पृष्ठभागावर आवरणाच्या जाडीची तपासणी
 पेंटच्या कोरड्या पृष्ठभागाचे मापन कोरड्या फिल्म थिकनेस गॉजच्या मदतीने केले पाहिजे. जर कोटिंगसाठी आवश्यक तेवढी जाडी साध्य झालेली नसेल, तर त्याला वायूविरहित स्प्रे, ब्रश किंवा रोलरद्वारे नीट केले पाहिजे.

वापर

 • ब्रशिंग
  • ब्रशला रंगात जास्त खोल बुडवू नये, कारण असे केल्याने ब्रशची बिस्टल्स जड होतील आणि ब्रशच्या पुढील भागापर्यंत रंग भरला जाईल आणि तो काढणे खूपच कठीण होऊन बसेल.
  • जेव्हा रंग लावायचा असेल, तेव्हा ब्रश पृष्ठभागापासून काही अंशांच्या कोनात धरला पाहिजे. त्यानंतर पृष्ठभागाच्या रंगवायचा आहे अशा भागावर अनेक सौम्य फटकारे मारावेत. मग रंग पूर्ण पृष्ठभाग व्यापेल असा पसरून एकसमान कोटिंग केले पाहिजे
  • संपूर्ण पृष्ठभाग रंगाने व्यापल्यानंतर रंगवलेल्या भागात एकसमानता आणण्यासाठी ब्रश आडवा फिरवावा आणि शेवटी ब्रशच्या खुणा आणि सुटलेले भाग रंग लावून गुळगुळीत करण्यासाठी हलक्या हाताने ब्रश चालवावा.  
  • पेटिंग संपल्यानंतर ब्रश विशिष्ट थिनर वापरून स्वच्छ करावा.
 • स्प्रे
  • यासाठी अनुकूल उपकरणाचा वापर केला पाहिजे. या उपकरणामध्ये रंगाचे अगदी बारीक कणांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असली पाहिजे आणि त्यात प्रेशर रेग्युलेटर, गॉज आणि स्पष्ट केलेले अन्य भागही असले पाहिजेत. 
  • रंग लावताना रंग लावण्याचे साहित्य स्प्रे पॉट्स किंवा अन्य कंटेनर्समध्ये नीट मिसळून ठेवले पाहिजे. या रंगाला यंत्रांच्या मदतीने सतत किंवा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने एकत्र करत राहिले पाहिजे.
  • स्प्रेची उपकरणे स्वच्छ ठेवली पाहिजेत.
  • नळीची लांबी, बाहेरचे तापमान आणि चिकटपणानुसार वायूविरहित स्प्रे पंपाच्या आतला दाब वेगवेगळा असेल. हवेच्या दाबामुध्ये आवश्यक सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून साहित्याचे एकसमान अॅटमायझेशन अर्थात बारीक बारीक भाग होत राहतील. 
  • स्प्रे गन समांतर दिशेने आणि पृष्ठभागाशी काटकोन साधत हलवली पाहिजे. यामुळे गुळगुळीत आणि एकसमान कोटिंग बसेल. प्रत्येक पासचे 50% ओव्हरलॅपिंग झाले पाहिजे
  • लोकांच्या दिशेने स्प्रे होणार नाही याचा काळजी घेतली पाहिजे. कारण, स्प्रे केला जाणारा पेंट किंवा थिनर उच्च दाबाने बाहेर पडत असतो.
  • अनेक घटक असलेला रंग स्प्रे केल्यानंतर सर्व वायूविरहित यंत्रे सांगितलेली थिनर्स वापरून स्वच्छ केली पाहिजेत.

आवरणाच्या जाडीवर नियंत्रण
 रंगाचे ओले आवरण मोजण्यासाठी रोलर गॉक किंवा कॉम्ब गॉज यांसारख्या वेट फिल्म थिकनेस गॉजची मदत घ्या. रंग लावल्यानंतर काही सेकंदातच माप घ्या, म्हणजे द्रावकाच्या बाष्पीभवनाचा प्रभाव कमी केला जाऊ शकेल.  

वाळण्याची प्रक्रिया
 रंगवलेल्या कोणत्याही पृष्ठभागाला तो पूर्ण वाळेपर्यंत स्पर्श करू नये. जेथे रंग वाळण्यासाठी आदर्श परिस्थिती नाही, तेथे योग्य तेवढी हवा खेळती राहील अशी व्यवस्था करून रंग वाळवला पाहिजे.

पर्यावरणाच्या दृष्टीने सुचवण्यात आलेल्या कोटिंग प्रणाली (एसएबीएस आयएसओ 12944-5नुसार अंदाजे तुलना)

सब्सट्रेट

सुरक्षेसाठी सुचवलेली प्रक्रिया

एकूण टीएफटी

(यूएम)

पर्यावरण

समतुल्य प्रणाली

एसएबीएस आयएसओ 12944-5
*सी1, 10वर्षे; सी3, 15वर्षे; सी5, 12वर्षे

स्टील

अल्किड+अल्किड (अल्क+अल्क) 70 - 100 *     एस1.05

स्टील

झिंक फॉस्फेट+अल्किड (ZnPO4+अल्क) 100 - 125 *      

स्टील

एपॉक्सी+एपॉक्सी(ईपी+ईपी) 225 - 275 *     एस1.34

स्टील

एपॉक्सी+पोलीयूरीथेन (ईपी+पीयू) 150-225   *   एस1.27

स्टील

एपॉक्सी+एपॉक्सी+पोलीयूरीथेन (ईपी+ईपी+पीयू) 190 - 265   *   एस1.34

स्टील

एपॉक्सीझिंक+एचबीएपॉक्सी(ईपी+एचबी ईपी) 180 - 220   * * एस3.21

स्टील

असेंद्रीय झिंक सिलिकेट+एपॉक्सीएमआयओ+पोलीयूरीथेन

(आयओझेड+एमआयओ+पीयू)
200 - 275     * एस7.12

स्टील

एपॉक्सी+एपॉक्सी+पोलीयूरीथेन

(ईपी+ईपी+पीयू)
450 - 530     *  

स्टील

एपॉक्सीझिंक+एपॉक्सी+पोलीयूरीथेन

(ईपीझेड+ईपी+पीयू)
195 - 235     * एस7.07
जस्ताचा मुलामा दिलेले स्टील

एपॉक्सी+एचबी एपॉक्सी

(ईपी+एचबी ईपी)
260 - 320   * *एस9.11
जस्ताचा मुलामा दिलेले स्टील एपॉक्सी+एपॉक्सी(ईपी+ईपी) 325 - 425   * * एस9.12
जस्ताचा मुलामा दिलेले स्टील एपॉक्सी+पोलीयूरीथेन (ईपी+पीयू) 225 - 275   * * एस9.12

 

ईएन आयएसओ 12944-2:1998 मध्ये केलेल्या व्याख्येनुसार
*सी1 – खूपच कमी गंज निर्माण करणारे वातावरण
सी3 – मध्यम गंज निर्माण करणारे  वातावरण
 सी1 – अत्युच्च (समुद्री) गंज निर्माण करणारे वातावरण

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा