भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

प्रक्रिया

वापरल्या जाणाऱ्या कोटिंग सामुग्रीनुसार पावडर कोटिंगच्या प्रक्रिया भिन्न प्रकारच्या असू शकतात. अर्थात, या प्रक्रियांचे वर्गीकरण सामान्यपणे चार कार्यांमध्ये केले जाऊ शकते:

पृष्ठभागाची तयारी एका प्रक्रियेसह सुरू होते, जेणेकरून पृष्ठभाग कोणत्याही प्रकारची घाण तसेच तेलांपासून मुक्त आहे याची खात्री केली जाईल. आवश्यकता भासल्यास तयारीचा पुढील टप्पा म्हणून ब्लास्टिंग केले जाऊ शकते आणि दीर्घ कालावधीसाठी गंजरोधनाची क्षमता हवी असल्यास आयर्न फॉस्फेट किंवा झिंक फॉस्फेटचा वापर केला जाऊ शकतो.  चांगल्या पद्धतीने चिकटण्यासाठी थर्मोप्लास्टिक पावडर्सना प्रायमरची गरज भासते. चिकटण्याची क्षमता वाढवणारे घटक आधीपासूनच अस्तित्वात असल्याने थर्मोसेट पावडरींना प्रायमरची गरज भासत नाही. अर्थात काही गुणधर्म वाढवण्यासाठी थर्मोसेट पावडरसाठीही प्रायमरचा वापर केला जाऊ शकतो.  प्रायमिंगसाठी वापरले जाणारे साहित्य पावडर कोटिंगसाठी आवश्यक क्युरिंग तापमानाला अनुकूल असले पाहिजे.

पावडरचा वापर म्हणजे दोन मूलभूत तंत्रांतील अनेकविध प्रकारांच्या मदतीने करण्याचे काम. ही तंत्रे म्हणजे फ्लुइडाइझ्ड किंवा द्रवीकृत बेड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे. फ्लुइडाइझ्ड बेड हे पावडर कोटिंगचे मूळ तंत्र आहे. आजही ते थर्मोप्लास्टिक पावडरच्या उपयोजनासाठी वापरले जाणारे प्राथमिक तंत्र आहे. जेथे आवरणाची उच्च बांधणी आवश्यक असते किंवा घटक खूपच छोटे असतात अशा काही थर्मोसेट पावडर्सच्या उपयोजनासाठ