भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

इंटिरिअर स्टाईल गाईड

नेरोलॅक एक्स्टिरिअर कलर गाईड ही अशी पुस्तिका आहे, जी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरील बाजूसाठी खास तयार करण्यात आलेल्या कलर पॅलेटचे पर्याय उपलब्ध करून देते. आपल्याला नेहमीच आपले घर हे एक दिमाखदार ठिकाण करायचे असते. ते कधी डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असते, कधी सुमद्राचे दर्शन घडविणाऱ्या सुळक्यावर असते तर कधी फुलांची बहार असलेल्या बागेत. आम्ही अशा जागांमधून रंगांची प्रेरणा घेतो आणि तीच दृष्टी तुमच्या घराच्या बाहेरील बाजूमध्ये दर्शवतो. नेरोलॅकने देशभर प्रवास करून भारतातील बदलती परिस्थिती जाणून घेतली आहे. या पुस्तकात शहरी भारतीय घरांसाठी प्रेरणादायी रंग समाविष्ट आहेत. जेव्हा आपण घरी पेंटिंग किंवा रिपेंटिंग करणार असतो तेव्हा आपण आपला प्रवास सुरू करण्यासाठी योग्य प्रेरणा शोधत असतो. घराची आणि आजुबाजूच्या परिसराची वास्तुरचना समजून घ्या. सात वैशिष्ट्यपूर्ण रंगकथांमधून तुमच्यासाठी योग्य कलर पॅलेटची निवड करा.

अभिजातपांढरा

आधुनिक कलांचा संग्रह असलेल्या घरासाठी अगणित रंगछटा असलेला पांढरा रंग अत्यंत साजेसा असतो. तो कॅनव्हासारखा असतो, ज्यावर घरातील सर्वच घटक उठून दिसतात.

अधिक जाणून घ्या

शहरीसंवेदना

आजकालच्या बहुतेक घरांची रचना ही शहरी संवेदनेचा विचार करून केलेली अशते. सौम्य क्रीम आणि लाल गुलाबी छटांमुळे या घरांना आकर्षक शहरी संवेदना प्राप्त होते.

अधिक जाणून घ्या

सूर्यासारखीतेजस्वी सुखे

एका खरोखर आरामशीर घरासाठी आपण शोधत असतो ते सूर्यकिरणांनी चकाकणारे आनंदी क्षण. परिचित लाकडी फर्निचर, पारंपरिक फॅब्रिक आणि पिवळा, गेरूआ, नारिंगी आणि ऑलिव्हसारखे उबदार रंग घराला एक प्रकारचा निवांतपणा देतात.

अधिक जाणून घ्या

तुमचाआवडता कोपरा

तुमची वृत्ती खेळकर असो, सुशेगाद असो वा तुम्ही मोकळेढाकळे असा, तुम्हाला तुमच्या घरात आपला असा एक कोपरा हवा असतो, जिथे तुम्ही रोजच्या दगदगीपासून दूर जाऊन निवांतपणे बसू शकता. ही अशी एक जागा असते जिथे तुम्ही घरी असूनही स्वप्नांच्या जगाची सफर करता.

अधिक जाणून घ्या

निसर्गाचे आकर्षण

तुमच्या घराचे रुपांतर आता एका लोभस नैसर्गिक वातावरणात करण्याची वेळ आली आहे. मोठे वृक्ष, ठळक रंग आणि नैसर्गिक सजावट तुमच्या घराला आगळ्यावेगळ्या भव्यतेने व्यापून टाकेल.

अधिक जाणून घ्या

मॉडर्नमोनोक्रोम

न्यूट्रल रंगांनी रंगवलेले हे आधुनिक रंगसंगतीतील घर सुरक्षेची जाणीव देईल. ग्रे आणि ब्राऊन रंग भिंतींला एक प्रकारचा सौम्य आणि निवांतपणा बहाल करतील, त्यामुळे हे घर एखाद्या शिंपल्यासारखे आरामदायी असेल.

अधिक जाणून घ्या

सीक्रेटगार्डन

जेव्हा तुम्ही प्रचंड वाहत्यारस्त्यानजीकच्या गगनचुंबी इमारतीती राहत असता, तेव्हा सीक्रेट गार्डन असावे, अशी इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात असते. कुणाच्याही नजरेस पडणार नाही, अशी एक बाग, जी फक्त तुमचीच असेल.

अधिक जाणून घ्या

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा