भाषा

लाइफ@नेरोलॅक

एचआर विभागाचे धोरण आणि संघटनात्मक कामगिरी

आमचे कर्मचारी आमच्या कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच कंपनीत कायम विश्वासाचे, आत्मविश्वासाचे आणि पारदर्शक वातावरण असावे असा आमचा कायम प्रयत्न असतो
कन्साई नेरोलॅकच्या एचआर विभागाने मूल्यांकन आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रणाली सुविहित करण्यासाठी अनेकविध साधने व प्रक्रियांचा वापर आणि उपक्रम सुरू केले आहेत.

कार्यप्रणाली

आरएमएस :केएनपीएलमध्ये एम्प्लॉयी सेल्फ सर्व्हिस पोर्टलवरील मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार भरती व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली. मनुष्यबळ आवश्यकतेची ऑनलाईन माहिती, रिक्त जागांचे शेअरिंग, पोझिशन स्टेटस ट्रॅकिंग आणि नवीन पदांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव तयार करणे इत्यादी संपूर्ण काळजी घेणारी सोल्युशन्स या प्रणालीने अमलात आणली.

पीएमएस :ऑनलाइन परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम (पीएमएस) हे एक वेबवर आधारित साधन असून यामुळे ज्यांचे मूल्यांकन होत आहे त्यांना तसेच ते मूल्यांकन करणाऱ्यांना तिमाही तसेच वार्षिक मूल्यांकनाच्या प्रक्रियांचा माग ठेवणे सुलभ होते. आपल्या कामगिरीचे मूल्यांकन कसे होत आहे हे समजून घेण्यात कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पीएमएसमुळे मदत होते. कर्मचारी त्यांची बलस्थाने, कच्चे दुवे आणि सुधारणेची आवश्यकता आदी बाबींवर आधारित असे त्यांचे रेटिंग व मूल्यांकन बघू शकतात. त्यामुळे त्यांना विकास व प्रशिक्षणासंदर्भातील गरजांवर चर्चा करून एक स्पष्ट दृष्टिकोन प्राप्त करण्याची संधी मिळते.


परफॉर्मन्स डायरी: कर्मचाऱ्याच्या कामाबद्दलच्या उपक्रमांची माहिती नोंदवणारे साधन म्हणजे परफॉर्मन्स डायरी. ही माहिती कर्मचाऱ्याच्या चालू वर्षातील केआरएशी संबंधित दैनंदिन उपक्रम आणि त्याने साध्य केलेल्या यशाबाबत असते.

बोल्ट:हा एक ऑनलाइन चाचणीचा चाकोरीबाह्य उपक्रम आहे. ऑनलाइन चाचणीच्या पलीकडे जाणारे हे एक साधन असून म्हणूनच त्याला बीओएलटी- बियॉण्ड ऑनलाइन टेस्टिंग असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा स्तर वाढवणे आणि करिअरमध्ये पुढे जाणे, मूल्यमापन आणि विविध विभागांशी समन्वय साधून काम करण्याबाबत त्यांचे मूल्यांकन करणे हे बोल्टचे उद्दिष्ट आहे.

कार्यपद्धती

कॅम्पस सहयोग : व्यवस्थापन आणि इंजिनीअरिंग क्षेत्रातील ताज्या दमाच्या प्रतिभावंतांची नियुक्ती प्रतिष्ठित व्यवस्थापन/इंजिनीअरिंग/तंत्रज्ञानात्मक संस्थांच्या माध्यमातून केली जाते. ताज्यातवान्या प्रतिभावंतांच्या या फौजेला लघुकालीन इंटर्नशिप, चर्चासत्र आणि कॅम्पस सहयोग उपक्रमांद्वारे उद्योगात आणले जाते. विद्यार्थ्यांमधील क्षमता वाढवून समाजाप्रति योगदान देण्यास नेरोलॅक वचनबद्ध आहे.