भाषा

नवीन स्टाइल गाइड


नेरोलॅक इंटिरिअर आणि एक्स्टिरिअर कलर गाइड्स ही अशी पुस्तके आहेत जी तुम्हाला तुमच्या घरासाठी सुंदर रंगांची निवड करण्यास प्रेरणा देतात. आधुनिक जागांच्या सौंदर्यात भर घालणारे रंग या पुस्तकात समाविष्ट आहेत. आपल्याला घर पुन्हा पेंट करायचे असते तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन करयाचे असते; पण आपले फर्निचर आणि फर्निशिंगमध्ये मात्र सध्याचीच रंगसंगती असते. त्यामुळे आपल्या सध्याच्या इंटरिअरच्या सौंदर्याला पूरक ठरणारे आणि ती रंगसंगती उठून दिसेल अशा प्रकारच्या रंगांची निवड करायची असते. कलर गाइडमध्ये सात अत्यंत पूरक अशा थिमॅटिक आयडिया आहेत. त्यात अत्यंत आकर्षक रंगसंगती आहे. या संकल्पना म्हणजे जीवनशैलीच्या संकल्पना आहेत. आपल्याला या रंगांमधून ज्या प्रकारची अभिव्यक्ती हवी आहे आणि आपल्या घराचे सौंदर्य वाढवायचे आहे ते रंग या संकल्पनांमध्ये आहेत. प्रत्येक कलर पॅलेट ही एकमेकांना पूरक असणाऱ्या रंगांचा समूह आहे. हे रंग आरामात मिसळले आणि एकमेकांशी जुळवले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने त्यांचा घरासाठ वापर करू शकता. किंवा वेगवेगळ्या खोल्यांसाठी वेगवेगळ्या पॅलेट वापरू शकता. नेरोलॅकने संपूर्ण भारताची सफर केली आहे आणि भारतीय जीवनशैलीमधील बदल पाहिला आहे. भारतातील शहरी घरांसाठी प्रेरणादायी रंग या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहेत. आपल्या घराला रंग देताना किंवा रिपेंटिंग करताना आपण योग्य प्रेरणेपासून सुरुवात करतो. घराची वास्तुरचना आणि परिसराची रचना समजून घेतो. सात वैशिष्ट्यपूर्ण रंगकथांमधून तुम्हाला साजेशी कलर पॅलेट निवडतो.

कार्यक्रमाची छायाचित्रे

इंटिरिअर स्टाईल गाईड

एक्स्टिरिअर स्टाईल गाईड

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा