सन २०१० - शाहरुखखान नेरोलॅकचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.२००६ - जीएनपीएलचे नामकरण कन्साई नेरोलॅक असे करण्यात आले२००४ ते २००६ - लोटे आणि जैनपूर येथील कारखान्यांना अनुक्रमे ग्रीनटेक सुरक्षा सुवर्ण आणि रौप्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या कारखान्यांना OHSAS18001 प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त झाले. नरोलॅक ब्रँडवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्री. अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन करण्यात आले. वंचित मुलांना मदत करण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनच्या सहयोगाने उपक्रम सुरू करण्यात आले.
२०००-१९९१
सन २००० पर्यंत कन्साईन पेंट्सने फोर्ब्स गोकाक आणि त्यांच्या सहयोगींच्या हिश्श्याचे संपादन केले आणि ही कंपनी १९९९साली कन्साई पेंट्सची उपकंपनी झाली. या कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी आता कन्साई पेंट्सचा हिस्सा ६४.५२% आहे. ‘जब घर की रौनक बढानी हो’ ही नेरोलॅक जिंगल लोकप्रिय झाली.
१९९०-१९८१
८३ साली नेरोलॅकने मुंबईआणि पुण्यात GNP101 ऑटो पेंट्स सुरू केले. यात २४ मूलभूत रंगछटांची रेंज, मेटॅलिक रेंजमधील १२ रंगछटा आणि व्हायब्रंट रेंजमधील १२ रंगछटा समाविष्ट होत्या. ऑटोमोटिव्ह उत्पादनांसाठी कॅथॉडिक इलेक्ट्रोडपोझिशन प्रायमर आणि इतर अत्याधुनिक कोटिंगसाठी जीएनपीएलनेजपानमधील कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड यांच्याशी ओसाका येथे १९८६ साली टीएएवर स्वाक्षरीकेली. भारतात हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी जीएनपीएल ही पहिली कंपनी होती.
१९८०-१९५०
१९७० साली गुडी हा हसणारा वाघ कंपनीचा मॅस्कॉट म्हणून सादर करण्यात आला. १९५७ साली कंपनीचे नाव बदलून गुडलास नेरोलॅक पेंट्स प्रा. लि. असे ठेवण्यात आले. कंपनीच्या सर्वात यशस्वी उत्पादनाचे नाव कंपनीच्या ब्रँड नावात समाविष्ट करणे उचित ठरेल , हा या नावबदलामागील विचार होता. १९६८ साली ही कंपनी पब्लिक (सार्वजनिक) झाली आणि प्रायव्हेट हा शब्द वगळण्यात आला. १९५०च्या दशकात लष्करी साधनांमध्ये वापरण्यात येणारे अँटि-गॅस वॉर्निश हे कंपनीचे सर्वात लोकप्रिय उत्पादन होते.
१९२० च्या दशकाची सुरुवातनोव्हेंबर
१९३० मध्ये तीन ब्रिटिश कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन गुडलास वॉल अँड लीड इंडस्ट्रीज ग्रुपलि. स्थापन झाली. त्यानंतर ही कंपनी लीड इंडस्ट्रीज ग्रुप (एलआयजी) लि. झाली. एप्रिल १९३३ मध्ये एलआयजी, लिव्हरपूल, इंग्लंडने कंपनीचे संपादन केले आणि गुडलास वॉल (इंडिया) लि.,असे नामकरण केले. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला अॅलेन ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड या इंग्लिश कंपनीने अमेरिकी पेंट अँड वॉर्निश कंपनी विकत घेतली आणि ती गहागन पेंट्स अँड वॉर्निश कं. लि. झाली.