आम्ही दर वर्षी अनेक प्रमुख व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानात्मक/इंजिनीअरिंग संस्थांमधून युवा मॅनेजमेंट पोस्टग्रॅज्युएट्सची नियुक्ती करतो. निवड प्रक्रियेत गट चर्चा, कलमापन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असतो. सुरुवातीला एक महिन्याच्या तपशीलवार इंडक्शन कार्यक्रमानंतर, प्रशिक्षणार्थींना एक वर्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना फंक्शनल प्रोफाईल्सचा भाग होण्याची संधी मिळते. सुरुवातीची कामगिरी व प्रशिक्षणाची ही प्रक्रिया नेरोलॅकमध्ये एवढी सशक्त आहे की संस्था व प्रशिक्षणार्थी या दोहोंना अधिक चांगले होण्यात याचा फायदा मिळतो.
वरिष्ठ व्यवस्थापनातील अनेक सदस्यांनी खरे तर आपल्या करिअरची सुरुवात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती आणि आज ते कंपनीत उच्च पदांवर पोहोचले आहेत.
कॅम्पस सहयोगाच्या उपक्रमाद्वारे नेरोलॅकमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवून समाजात योगदान देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला [email protected] या मेलवर संपर्क साधा आणि आमच्याशी जोडून घ्या.
नेरोलॅकमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींशिवाय आणखी कोणीही कोणत्याही स्तरावर समाविष्ट होऊ शकते. खालील कामांमध्ये आमच्यासोबत करिअर शोधू पाहणाऱ्यांचे स्वागत आहे:
डेकोरेटिव्ह सेल्स आणि मार्केटिंग – यासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी आणि मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन असलेले व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे. तुमच्याजवळ कन्झ्युमर ड्युरेबल्स, ल्युब्रिकंट्स, पेंट्स आणि संबंधित उद्योगांमध्ये विक्री व मार्केटिंगचा २ वर्षांहून अधिक अनुभव असणेही गरजेचे आहे.
औद्योगिक विक्री आणि मार्केटिंग – तुमच्याकडे कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठातून घेतलेली विज्ञान शाखेतील किंवा इंजिनीअरिंगची पदवी आणि मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण असेल तर तुम्ही या जॉबसाठी अर्ज करू शकता. तुमच्याकडे ऑटो/ऑटो सहायक किंवा ओईएम कंपनीमध्ये बी टू बी विक्री/तांत्रिक सेवांचा २ वर्षांहून अधिक अनुभव असणेही आवश्यक आहे.
संशोधन आणि विकास – आमच्या ओईएम तसेच अन्य ग्राहकांसाठी आम्ही सातत्याने नवीन उत्पादने, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि तांत्रिक सेवा देत राहतो. आम्ही नवीन रंग व रंगछटा विकसित करतो. आमच्याकडे जपानी तंत्रज्ञानाचे पाठबळ अशलेली सुसज्ज व जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आहे. आम्हाला हवे आहेत संशोधक वृत्तीचे लोक. त्यांच्याकडे रंग तंत्रज्ञान, केमिकल इंजिनीअरिंग आणि संबंधित विषयांतील शिक्षण व पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
फायनान्स/लेखा/कंपनी सेक्रेटरियल – तुम्हाला यातील कोणत्या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे सीए/सीएस पदवी किंवा फायनान्समध्ये एमबीए आणि २ वर्षांचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे.
कॉस्टिंग- आयसीडब्ल्यूएशिवाय, तुमच्याकडे केमिकल प्रोसेस उद्योगातील कॉस्टिंगचा थोडा अनुभवही असेल तर तुम्ही आमच्या आवश्यकतेमध्ये चपखल बसता.
उत्पादन/मध्यवर्ती इंजीनियरिंग – आमचे कारखाने बावल, जैनपुर, चेन्नई, लोट आणि होसुर येथे आहेत. तुम्ही केमिस्ट्री, पेंट्स टेक्नोलॉजी, केमिकल इंजिनीयरिंग, मेकॅनिकल इंजीनीयरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे पदवीधर असाल आणि तुमच्याकडे उत्पादन किंवा प्लांट इंजिनीयरिंगचा किमान २ वर्षांचा अनुभव असेल, तर तुम्ही उत्पादन आणि इंजीनियरिंग विभागात अधिकाऱ्यांच्या जागेसाठी अर्ज करू शकता.
पुरवठा साखळी/मटेरिअल्स/एपीओ/खरेदी – तुमच्याकडे इंजिनीअरिंगच्या पदवीसह पुरवठा साखळी, मटेरिअल व्यवस्थापनात एमबीए आणि पुरवठा साखळी, मटेरिअल व्यवस्थापनात प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल तर या क्षेत्रातील आमच्या आवश्यकतेसाठी तुमची पात्रता अगदी योग्य आहे. इंजीनिअरिंगची पदवी आणि एपीओ प्रशासनाचा अनुभव तुम्हाला या पदासाठी योग्य उमेदवार करण्यास पुरेसे आहेत.
माहिती तंत्रज्ञान/आयटी सपोर्ट – सॅप ईसीसी 6.0 अपग्रेड केल्यामुळे सॅपच्या अनेक मोड्यूल्ससाठी, उदाहरणार्थ, एसडी, एमएम, पीपी, एफएससीएम, जीआरसी, ईएचएस, डेटा वेअरहाउसिंग आणि एम्प्लॉयी पोर्ट्ल, या विभागांमध्ये संधीची द्वारे खुली झाली आहेत. तुमच्याकडे आवश्यक आयटी कौशल्ये आणि शैक्षणिक पात्रता तसेच सॅप मोड्युल्सवर काम करण्याची क्षमता आणि लाइव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव असेल तर आमच्या कंपनीत समाविष्ट होण्यास तुम्ही योग्य आहात.
मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विकास, प्रशासकीय सेवा - तुमच्याकडे एचआर/पर्सोनेल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव असेल, तर कॉर्पोरेट कार्यालय किंवा कोणत्याही कारखान्यात नोकरीसाठी तुमचा विचार होऊ शकतो.
Get some inspiration from these trending articles
Looking for something else? Drop your query and we will contact you.