सध्या रिक्त असलेल्या जागा
नेरोलॅकमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींशिवाय आणखी कोणीही कोणत्याही स्तरावर समाविष्ट होऊ शकते. खालील कामांमध्ये आमच्यासोबत करिअर शोधू पाहणाऱ्यांचे स्वागत आहे:
डेकोरेटिव्ह सेल्स आणि मार्केटिंग
आवश्यकता:
- कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी आणि मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसह व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण.
- कन्झ्युमर ड्युरेबल्स, ल्युब्रिकंट्स, पेंट्स आणि संबधित उद्योगांमध्ये विक्री किंवा मार्केटिंगमध्ये २ वर्षांहून अधिक अनुभव
इंडस्ट्रियल विक्री आणि मार्केटिंग
आवश्यकता:
- कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठातून घेतलेली विज्ञान शाखेची किंवा इंजिनीअरिंगची पदवी आणि मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसह व्यवस्थापनातील पदव्युत्तर डिग्री.
- ऑटो/ऑटो सहाय्यक किंवा ओईएम कंपनीत बी टू बी विक्री/तांत्रिक सेवेचा २ वर्षांहून अधिक अनुभव.
संशोधन आणि विकास
आवश्यकता:
- संशोधनाची वृत्ती तसेच पेंट टेक्नोलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग आणि संबंधित विषयांमध्ये योग्य शैक्षणिक पात्रता व उपयुक्त अनुभव.
फायनान्स/लेखा/कंपनी सेक्रेटरियल
आवश्यकता:
- सीए/सीएस किंवा फायनान्समध्ये एमबीएसह २ वर्षांचा संबंधित अनुभव।
- कॉस्टिंग
- आवश्यकता:
- आईसीडब्ल्यूएशिवाय, तुमच्याकडे केमिकल प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये कॉस्टिंगचा थोडा अनुभव असेल, तर तुम्ही आमच्या आवश्यकतेत चपखल बसत आहात.
उत्पादन/सेंट्रल इंजीनियरिंग
आवश्यकता:
- केमिस्ट्री, पेंट्स टेक्नोलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि उत्पादन किंवा प्लांट इंजिनीअरिंगमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव.
पुरवठा साखळी/सामुग्री/एपीओ/खरेदी
आवश्यकता:
- इंजिनीअरिंगच्या पदवीसह सप्लाय चेन, मटेरिअल व्यवस्थापनात एमबीए आणि पुरवठा साखळी किंवा मटेरिअल व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव अथवा इंजिनीअरिंगच्या पदवीसह एपीओ प्रशासनाचा अनुभव.
माहिती तंत्रज्ञान/आयटी सपोर्ट
आवश्यकता:
- आवश्यक आयटी कौशल्ये, सॅप मोड्युल्सवर काम करण्याचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेसह रिअल लाइव्ह प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव.
मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विकास, प्रशासकीय सेवा
आवश्यकता:
- एचआर/पर्सोनेल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा और २ वर्षांचा अनुभव.