भाषा

सेवा घेणारे उद्योग

व्हाइट गुड्स उद्योगांमध्ये मोठ्या तसेच छोट्या उपयोजनांसाठी सर्वोच्च दर्जाची कोटिंग्ज पुरवण्यासाठी आम्ही ओळखले जातो. आमच्या गंजरोधक कोट्सचा फायदा म्हणजे केवळ एकच पावडर कोट पुरेसा असतो. हे कोटिंग उपकरणांच्या विस्तृत रेंजसाठी वापरले जाते. त्यांमध्ये पुढील उपकरणांचा समावेश होतो:

 • वातानुकूलित यंत्रे
 • मायक्रोवेव्ह ओव्हन
 • रेफ्रिजरेटर
 • वॉशिंग मशीन

ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या सध्याच्या उपयोजनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: एअर फिल्टर हाउसिंग, ब्रेक कॅलिपर्स आणि सुटे भाग, ब्राइट ट्रिम मोल्डिंग, बंपर बार, दारांची हॅण्डल्स, इंजिन मिरर हाउसिंग्ज, मोटरसायकलच्या फ्रेम्स, ऑइल फिल्टर हाउसिंग्ज, रॉकर कव्हर्स, सीट फ्रेम्स, स्टीलची चाके.

फर्नीचर उद्योग ही पावडर कोटिंग्ससाठी एक मोठी बाजारपेठ आहे. घरगुती आणि व्यावसायिक फर्निचरची क्षमता व सजावट अधिक चांगली करण्यासाठी याचा वापर व्यापक प्रमाणावर होतो. 

पावडर कोटिंगला फर्निचर उद्योगासाठी अनुकूल करणारी ही काही वैशिष्ट्ये:

 • मजबूती
 • काठीण्य
 • गंजरोधन
 • रंगछटांची विस्तृत रेंज
 • ओरखड्याला उत्तम प्रतिबंध
 • उत्कृष्ट चमक

इलेक्ट्रिकल उद्योगातील सध्याच्या उपयोजनांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

 • पंखे
 • लाइट फिक्स्चर्स
 • इलेक्ट्रिकल पॅनल
 • अन्य इलेक्ट्रिकल उपकरणे
 • डीजी जेनसेट

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा