भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

घरातील वातावरणाचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो आणि आपल्या घरातील परिस्थिती विविध प्रकारच्या आजारांना किंवा विकारांना कारणीभूत ठरू शकते किंवा भर घालत असते. घरातील अनेक आरोग्य समस्या या पर्यावरणीय असतात. त्यामुळे लहान मुले, प्रौढ व्यक्ती आणि संपूर्ण वस्तीलाच धोका निर्माण होते.

बहुतेक व्यक्ती त्यांचा दिवसातील बहुतांश वेळ घरात घालवत असल्यामुळे या व्यक्ती विषारी घटक, अॅलर्जीची लागण करणारे घटक आणि घातक वायूंच्या संपर्कात येऊ शकतात.

व्हीओसी हे कार्बययुक्त संयुग असते ज्याचे पटकन बाष्पीभवन होते. जेव्हा हे घटक हवेत प्रवेश करतात तेव्हा ते इतर घटकांसोबत क्रिया करून ओझोन तयार करतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते आणि श्वसनाची समस्या, डोकेदुखी, जळजळणे, डोळे पाणावणे आणि मळमळणे यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही व्हीओसींचा संबंध कर्करोग आणि मूत्रपिंड /यकृत निकामी होण्याशीही जोडला जातो.

रंग, वॉर्निश, घरगुती स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी रसायने, गोंद, शाई आणि बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य.

फुप्फुसांशी संबंधित आजार, अॅलर्जी, डोळे पाणावणे, नाक वाहणे, डोळे लाल होणे, कफ आणि घसा खवखवणे यासाठी व्हीओसी कारणभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे व्हीओसींमुळे नवजात बालकांची प्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते.

There are three main reasons why VOC concerns could prove to be fatal for a baby:

नवजात बालकांचे फुप्फुस विकसित होत असते आणि प्रौढांच्या तुलनेत ते अधिक नाजूक असते. या वाढीच्या टप्प्यात फुप्फुसांच्या टिश्युंना सहज इजा होऊ शकते आणि वय वाढल्यावरही या टिश्युंना झालेले नुकसान भरून निघत नाही.बाळाच्या फुप्फुसाच्या एकूण आकारमानामुळे हवेच्या दर्जाचा त्यावर लगेच परिणाम होत असतो.

हवा थोडीशी प्रदूषित असेल तर त्याचा सौम्य परिणाम प्रौढ व्यक्तीच्या फुफ्फुसांवर होईल,
पण नवजात बालकाच्या विकसित होणाऱ्या फुफ्फुसांवर मात्र त्या थोड्याशा प्रदूषणाचा गंभीर परिणाम होतो.
बाळांच्या हृदयाचा आकार लहान असल्याने त्यांचा दर तासाला श्वसनाचा वेग प्रौढांपेक्षा खूप जास्त असतो.
त्यामुळे हवेच्या दर्जाचा त्यांच्या फुफ्फुसांवर अधिक परिणाम होतो.

लहान मुले दिवसातील बहुतांश वेळ घरातच घालवतात आणि त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ते नाजूक असतात. प्रौढांच्या तुलनेने लहान मुलांच्या शरीरात अधिक प्रमाणात पर्यावरणातील दूषिक घटक जातात आणि या दूषित घटकांमुळे त्यांच्या वेगाने वाढणाऱ्या अवयवांवर दुष्परिणाम होतात. बाळे जमिनीवर रांगत असल्यामुळे, ज्या ठिकाणी जे सगळे दूषित घटक येऊन बसतात, त्यांच्या संपर्कात ही बाळे येत असतात. त्यांच्या खेळण्यामुळे आणि हात तोंडात घालत असल्यामुळे हे सर्व दूषित घटक सहजपणे त्यांच्या शरीरात जातात. त्यामुळे त्यांच्या रक्तात शिशाचे प्रमाण वाढू शकते, अस्थमा होतो आणि श्वसनाचे इतर विकार होतात.

व्हीओसीचा वृद्धांच्या फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतो. व्हीओसीमुळे प्रौढांना हृदयविकार किंवा फुप्फुसांचा विकार होऊ शकतो. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी (फुप्फुसांच्या कार्यक्षमतेला अडथळा निर्माण करणारा गंभीर आजार) होऊ शकतो.

गर्भावस्थेत व्हीओसीशी किमान संपर्क येणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. व्हीओसीमुळे मासिक पाळीमध्ये समस्या निर्माण होऊन महिलेच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो. नंतरच्या काळात रक्तदाबही वाढतो.

व्हीओसीची तीव्रता अधिक असेल तर पुरुषांच्या आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. परक्लोरोइथेलिन हे ड्राय क्लिनिंग सॉल्व्हन्ट महिलेच्या स्तनांमधील दुधात जाते आणि ते नवजात बालकाच्या शरीरात जाण्याची शक्यता असते.

उच्च तीव्रता असलेल्या व्हीओसीशी संपर्क आल्यामुळे गर्भपात, नवजात बालकाचे वजन कमी असणे, जन्मजात व्यंगे, वाढीमधील अक्षमता आणि मुलांना कर्करोग होण्याचा धोका असतो.

विषारी घटकांना टाळण्यासाठी घरात चांगले वायूविजन, ओलावा व पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानावर नियंत्रण ठेवणे, ज्वलनशील पदार्थांमधून उष्णता व गॅस योग्यप्रकारे उत्सर्जित होणे आणि मूलभूत उपाययोजना करणे आवश्यक असते. बहुतेक प्रकरणांमध्ये रिनोव्हेशन किंवा रिमॉडेलिंग करताना घरांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा धोके निर्माण होण्याला प्रतिबंध करण्यासाठी दुरुस्तीच्या कार्यपद्धतीत काही जुजबी बदल करण्याची गरज असते. उदा. प्रत्येक बाथरूम आणि स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन असावा, जेणेकरून ओलावा निघून जाईल आणि आर्द्रता कमी होईल. त्याचप्रमाणे घरात आरोग्याला हानीकारक लक्षणे नसल्याची तपासणी नियमितपणे करून घ्यावी.

ज्या रंगांवर ग्रीन सील लावलेले असते ते रंग पर्यावरणीय प्रमानकांचे काटेकोर पालन करतात. ग्रीन सील असलेल्या रंगामध्ये व्हीओसी घटकांचे प्रमाण नॉन-फ्लॅट फिनिशसाठी १०० ग्रॅ/लि. पेक्षा कमी आणि फ्लॅट फिनिशसाठी ५०ग्रॅ/लि. पेक्षा कमी असावे लागते. प्रायमर्स आणि फ्लोअर पेंट्ससाठी व्हीओसीची मर्यादा १०० ग्रॅ/लि. आहे तर रिफ्लेक्टिव्ह वॉल कोटिंग्समध्ये हे प्रमाण ५०ग्रॅ/लि.पेक्षा जास्त असू शकत नाही. त्याचप्रमाणे लो व्हीओसी पेंट (व्हीओसीचे प्रमाण कमी असलेल्या रंगाचे) उत्पादन करणाऱ्यांना व्हीओसी प्रमाणपत्र देण्यात येते.

लेटेक्स आणि फ्लॅट फिनिश पेंट्स तेलावर आधारित आणि इतर पेंट्स
कमी व्हीओसी असलेले पेंट< 250 ग्रॅम प्रति लिटर< 380 ग्रॅम प्रति लिटर
व्हीओसीमुक्त पेंट< 5 ग्रॅम प्रतिलिटर

Write To US - Dev

आम्हाला लिहा

 
1 Start 2 Complete