भाषा

तांत्रिक मार्गदर्शन

थर उत्तम प्रकारे बसावा यासाठी पृष्ठभाग व्यवस्थित तयार करून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही स्टीलच्या ताटल्यांसाठी प्रारंभिक पृष्ठभाग उपचारांचे वर्णन केले आहे, दुय्यम पृष्ठभाग उपचारांचे वर्णन फॅब्रिकेटेड स्टीलसाठी केले आहे आणि दुरुस्तीच्या पेंटचे अॅप्लिकेशन्स कसे करावे हेही सांगितले आहे.

स्टीलच्या ताटल्यांसाठी पुढीलप्रमाणे प्रारंभिक पृष्ठभाग उपचारांचे अॅप्लिकेशन्स करावे.

 • स्वच्छ कापड किंवा ब्रश द्रावकात भिजवून त्याने स्टील पुसून तसेच घासून तेल किंवा ग्रीस पूर्णपणे काढून टाकावे. स्टीलला घट्ट चिकटलेले घटक घासून आणि द्रावकाने पुसून काढून टाकले पाहिजेत.
 • क्लोराइड्स किंवा सल्फेट्ससारखे गंज आणणारे क्षार स्टीलच्या पृष्ठभागावरून पाण्याने धुवून काढले पाहिजेत. स्टील कोरड्या फडक्याने पुसून किंवा गरम हवेच्या सहाय्याने स्टील वाळवून त्यावरील पाणी व आर्द्रताही काढून टाकली पाहिजे.
 • आयएसओ मानकांची पूर्तता करण्यासाठी सर्व ढलप्या, गंज, गंजाचे डाग आणि रंगाचे डाग किंवा बाहेरील घटक दगडाचे कण किंवा सॅण्ड ब्लास्टिंगच्या मदतीने काढून टाकले पाहिजेत.
 • शॉप प्रायमर लावण्यापूर्वी धूळ, मातीचे कण, स्टीलचे तुटके तुकडे किंवा दगडाचे कण आणि अन्य दूषित घटक व्हॅक्युम क्लीनर किंवा एअर ब्लोअर वापरून काढून टाकले पाहिजेत.

सदोष व हानी झालेले भाग ब्लास्टिंग किंवा शक्तिशाली यंत्राच्या सहाय्याने स्वच्छ केले पाहिजेत. पुढील कोट देण्यापूर्वी ग्रीस काढून टाकून आणि धुऊन पृष्ठभाग पुन्हा स्वच्छ करण्याची गरज भासू शकेल. हे करण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा:

 • टणक फायबर किंवा वायरच्या ब्रशने किंवा दोन्ही घटक असलेल्या ब्रशने स्टील घासून गंजकारक क्षार, खडूच्या खुणा, माती आणि अन्य प्रदूषके व बाहेरील घटक काढून टाकावे.
 • द्रावकांचा वापर करून जमलेले तेल व ग्रीस काढून टाकावे.
 • वेल्डिंग केलेल्या भागातील वेल्डचे घटक, वेल्डिंगच्या धातूचे कण, वेल्डिंग करताना निर्माण झालेल्या धुराचे डाग, डाग पडलेल्या किंवा खराब झालेल्या पेंट फिल्म्स काढून टाकण्यासाठी ब्लास्ट क्लीनर किंवा शक्तिशाली यंत्र वापरून काढून टाकावे.
 • धूळ, मातीचे कण किंवा अन्य प्रदूषके स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर वापरा.

पृष्ठभाग तयार करण्याच्या दर्जाचे गंभीर परिणाम पेंट फिल्म्सच्या कामगिरीवर होतात. म्हणून, पेंटिंग सुरू करण्यापूर्वी पृष्ठभाग तयार करण्याची पद्धत आणि तीव्रता या दोहोंची योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. उपचारपूर्व पद्धतींच्या निवडीवर प्रभाव टाकू शकतील असे काही घटक पुढे थोडक्यात दिले आहेत :

 • पृष्ठभागाची भौतिक आणि रासायनिक स्वच्छता
 • पृष्ठभागाची स्थिती
 • पृष्ठभागाची रूपरेखा
 • पेंटची वैशिष्ट्ये
 • सुरक्षिततेचे मुद्दे
 • पर्यावरणाच्या दृष्टीने निर्बंध
 • उपलब्ध उपकरणांचे प्रकार
 • मागील उपचारांचे प्रकार

उपचारपूर्व पद्धती आणि पेंट प्रणालीचा प्रकार निश्चित करताना यासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाचाही विचारही केला पाहिजे.  

प्रक्रिया परिणाम
ब्लास्ट क्लीनिंग आदर्श
यांत्रिक वायर-ब्रशिंग स्वीकारार्ह
यांत्रिक डिस्क-सँडिंग स्वीकारार्ह
सुईने कापून तोडणे समाधानकारक
यांत्रिक स्क्रॅपिंग समाधानकारक
हाताने ब्रश करणे वाईट
हाताने खरवडणे वाईट
वॉटर-जेट क्लिनिंग स्वीकारार्ह
प्रणाली (एसएसपीसी) (एनएसीई) (आईएसओ) बीएस:4232-67
द्रावकाद्वारे स्वच्छता एसएसपीसी-एसपी 1 - - -
हँड टूलच्या मदतीने स्वच्छता एसएसपीसी-एसपी 2 - एसटी- 2(अंदाजे) -
पॉवर टूलद्वारे स्वच्छता एसएसपीसी-एसपी 3 - - -
फेम क्लीनिंग एसएसपीसी-एसपी 4 - - -
व्हाइट मेटल ब्लास्टिंग एसएसपीसी-एसपी 5 एनएसीई 1 एसए-3 फर्स्ट क्वालिटी
व्यावसायिक ब्लास्टिंग एसएसपीसी-एसपी 6 एनएसीई 3 एसए-2 थर्ड क्वालिटी
ब्रश ऑफ ब्लास्टिंग एसएसपीसी-एसपी 7 एनएसीई 4 एसए-2 -
पिकलिंग एसएसपीसी-एसपी 8 - - -
वेदरिंग आणि ब्लास्टिंग एसएसपीसी-एसपी 9 - - -
नीअर व्हाइट मेटल ब्लास्टिंग एसएसपीसी-एसपी 10 एनएसीई 2 एसए-3 सेकंड क्वालिटी

 

*स्टील स्ट्रक्चर पेंटिंग काउन्सिलचे तपशील
नॅशनल असोसिएशन ऑफ करोजन इंजीनियर्सद्वारे दिलेले तपशील
स्वीडिश मानक
 ब्रिटिश मानक तपशील

अल्युमीनियम/टिन/कॉपर/ब्रास आणि अन्य लोहरहीत धातू:

 • कोरडा आणि स्वच्छ पृष्ठभाग
 • कोणत्याही प्रकारच्या तेलापासून/चिकटपणापासून मुक्त
 • स्वच्छ केलेल्या पृष्ठभागाला नॉन-मेटॅलिक कठीण पदार्थाने घासावे किंवा स्वीप ब्लास्टचा वापर करावा. त्यानंतर वॉश प्रायमरचा एक कोट लावला पाहिजे. 

जस्ताचा थर दिलेले (गॅल्व्हनाइझ्ड) स्टील:

 • तेल/चिकटपणापासून मुक्त
 • जस्तामुळे निर्माण झालेला पांढरा गंज स्वच्छ पाण्याची धार जोरात सोडून धुतला पाहिजे.
 • जस्ताचे द्रावणीय क्षार काढून टाकण्यासाठी पाण्याने धुण्याचा सल्ला दिला जातो.

स्टेनलेस स्टील:

 • स्टेनलेस स्टीलवर कोटिंग करण्यापूर्वी पृष्ठभाग फारसा तयार करण्याची गरज भासत नाही. फक्त हा पृष्टभाग तेल, चिकटपणा, घाण किंवा अन्य फॉरेन पार्टिकल्सपासून मुक्त असला पाहिजे. 
 • कोटिंग चांगल्या पद्धतीने चिकटेल हे निश्चित करण्यासाठी स्टेनलेस स्टीलवर एक पृष्ठभागाची प्रोफाइल तयार होणे आवश्यक आहे.
 • बहुतेक कोटिंग प्रणालींमध्ये 1.5 ते 3.0 मिल खोली असलेली प्रोफाइल लावण्याचा सल्ला दिला जातो.  

काँक्रिट आणि गवंडीकामाचा पृष्ठभाग

कॉन्क्रीटचा नवीन पृष्ठभाग:

 • कोटिंग करण्यापूर्वी कमीत कमी 30 दिवसांचा अवधी हा पृष्ठभाग नीट होण्यासाठी दिला पाहिजे.
 • काँक्रिट /गवंडीकामात आर्द्रतेचे प्रमाण ६ टक्क्यांहून कमी असले पाहिजे.
 • मोठे क्षेत्रफळ किंवा मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे वातावरण असल्यास पृष्ठभाग लाइट ब्लास्टिंगद्वारे तयार केला पाहिजे. ज्या जागांवर ब्लास्टिंग केले जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी लियाटेन्स (मिश्रणात पाणी जास्त झाल्यामुळे काँक्रिट वर जमा झालेले घटक) काढून टाकण्यासाठी तारांचा ब#2381;रश वापरला पाहिजे. त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्लात पाणी मिसळून या मिश्रणाने स्वच्छता केली पाहिजे.
 • प्रायमर लावण्यापूर्वी पृष्ठभाग पूर्णपणे वाळू द्यावा. 

काँक्रिटचा जुना पृष्ठभाग:

 • चिकटपणा आणि तेलासारखे दूषित घटक द्रावणाने पुसून किंवा 10% कॉस्टिक सोल्युशनने स्वच्छ करावे.
 • पृष्ठभागाला लाइट ब्लास्टिंगच्या मदतीने तयार केले पाहिजे. ज्या जागांवर ब्लास्टिंग करणे शक्य नाही, तेथे पाणीमिश्रित हायड्रोक्लोरिक आम्ल वापरून स्वच्छ करावे.
 • आम्ल आणि प्रदूषक घटकांना पाण्याने धुऊन स्वच्छ करावे.
 • पृष्ठभागावर तसेच सांध्यांवर आम्लाचे सोल्युशन राहणार नाही याची खात्री करून घ्या.
 • प्रायमर लावण्यापूर्वी पृष्ठभाग पूर्णपणे वाळू द्या. 

लाकडी पृष्ठभाग:

 • घाण/चिकटपणा/तेल स्वच्छ करण्यासाठी रासायनिक स्वच्छतेची एक किंवा त्याहून अधिक पद्धती वापराव्या.
 • गाठी, खिळे, भोके, भेगा आदींना फिलर कंपाउंडने भरून काढले पाहिजे किंवा नीट न चिकटलेले कोटिंग खरवडून काढावे आणि पृष्ठभाग घासून समतल करावा.
 • भेगा पडलेल्या पृष्ठभागाला चांगले धुऊन स्वच्छ करा आणि कोटिंगपूर्वी पूर्ण वाळू द्या.  

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा