नेरोफ्लोर मध्ये आपले स्वागत. कॉन्क्रिट/एमएस पृष्ठभागाच्या संरक्षणासाठी आणि अखंड तसेच एकसमान समतलतेसाठी येथे तुम्हाला फ्लोअर कोटिंग उत्पादनाची सर्वाधिक विस्तृत रेंज मिळेल. नेरोफ्लोर सेवा देत असलेली उद्योगक्षेत्रे म्हणजे एपॉक्सी सेल्फ लेव्हलिंग टॉपिंग्ज, द्रावणमुक्त (सॉल्व्हंट-फ्री) पॉलियुरेथेन्स, एपॉक्सी- पोलियुरेथेन्स (ईपीयू), डेक कोटिंग्ज, अॅण्टि-स्टॅटिक प्रणाली, रसायन रोधक प्रणाली, कार पार्किंग, डेकोरेटिव्ह प्रणाली आणि अन्य अनेकविध अॅप्लिकेशन्स. नेरोफ्लोर कोटिंग्जमध्ये रसायने, घर्षण, यंत्रांचा परिणाम, कठीण वस्तू यांचा प्रतिरोध करणारे गुणधर्म असून ती टणक असतात व काँक्रीटचे आयुष्य वाढवतात.
नेरोफ्लोर आपल्या जागतिक स्तरावरील उपस्थिती, जागतिक दर्जाच्या उत्पादन यंत्रणा, तांत्रिक कौशल्ये आणि नवीन व कल्पक उत्पादनांच्या जोरावर ग्राहकाच्या मागणीला अनुसरून कोणत्याही प्रकारची प्रणाली देण्यास सक्षम आहे. यंत्रांनी होणारी हानी, रसायनांची गळती, काँक्रीट कठीण होणे, जीवाणूंची वाढ, तडे जाणे, उंचसखलपणा यांच्यापासून संरक्षणासाठी तसेच फरशी सुंदर दिसावी म्हणून नेरोफ्लोअरची उत्पादने वापरली जातात. आता परिस्थितीनुसार उपयुक्त ब्रॅण्डचे फ्लोअर कोटिंग लावून फरशी सुरक्षित ठेवणे ही उद्योगांची मागणी आहे. याबाबत जागरूकता वाढल्यामुळे आता फ्लोअर कोटिंग्जचा स्वीकार वाढला आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण फ्लोअर कोटिंग प्रणाली सेवा देतो. ही कोटिंग्ज आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करतो.
आम्ही एंड युझससोबत काम करतो, मोफत तांत्रिक सेवा देतो आणि फरशीची तपासणी करून अनुकूल कोटिंगचा सल्ला देतो.