भाषा

फरशीची काळजी घेणे

योग्य ती फ्लोअर कोटिंग प्रणाली निवडली आणि पृष्ठभाग योग्य पद्धतीने तयार झाल्याची खात्री केली की काम अर्धे झाल्यासारखे आहे. तुम्ही फरशीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा पुरेसा मोबदला मिळावा यासाठी आवश्यक ती काळजीही घेतली पाहिजे. खालील उपायांमुळे फ्लोअर कोटिंग प्रणालीची कामगिरी अधिक चांगली होईल आणि ती दीर्घकाळ टिकेल. 

 • पाणी साचू देऊ नका, शक्य तितक्या लवकर पुसून वाळवून टाका.
 • रसायने किंवा सॉल्व्हंट्स सांडणार नाहीत याची काळजी घ्या, सांडलीच तर शक्य तितक्या लवकर पुसून कोरडे करा.
 • तेल सांडू देऊ नका, सांडलेच तर शक्य तितक्या लवकर पुसून कोरडे करा.
 • सामान सरकवताना ओढू नका.
 • मोठा आघात होणार नाही याची काळजी घ्या.
 • टोकदार वस्तू फरशीवर पाडू नका.
 • पृष्ठभागावर पॉइंड लोड येता कामा नये.
 • स्टीलची/लोखंडी चाके असलेल्या ट्रॉलीचा वापर करू नका. 
 • फरशीचा पृष्ठभाग गरम होऊ देऊ नका. वेल्डिंगसारखी उष्णता निर्माण करणारी कामे येथे करू नका.
 • काही कामासाठी उपकरणांचा वापर करायचा असेल, तर रबरी मॅट अंथरा.
 • दिवसातून दोन वेळा स्वच्छ करा.
 • सौम्य डिटर्जंटचा वापर करून पाण्याने चांगले स्वच्छ करा.
 • फरशी पुसून कोरडी करा आणि पूर्णपणे वाळल्यानंतर तिचा वापर करा. 

 

पूर्वी

नंतर

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा