भाषा

Buy
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
X
Get in touch
 
1 Start 2 Complete
Send OTP
सादर करा

व्हीओसी म्हणजे काय?

घराला नुकताच रंग दिला असेल तर त्याचा वास पटकन येतो. एकीकडे घर सुंदर दिसत असते तर दुसरीकडे व्हीओसी हे त्याचे बायप्रोडक्ट असते.

व्हीओसी हे कार्बययुक्त संयुग असते, ज्याचे पटकन बाष्पीभवन होते. जेव्हा हे घटक हवेत प्रवेश करतात तेव्हा ते इतर घटकांसोबत क्रिया करून ओझोन तयार करतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते आणि श्वसनाची समस्या, डोकेदुखी, जळजळणे, डोळे पाणावणे आणि मळमळणे यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही व्हीओसींचा संबंध कर्करोग आणि मूत्रपिंड /यकृत निकामी होण्याशीही जोडला जातो. 

जेव्हा रंग वाळतो तेव्हा हे घातक व्हीओसी मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जातात. घरातील व्हीओसीची पातळी ही बाहेरील व्हीओसींच्या तुलनेत १० पट अधिक असते. व्हीओसीची पातळी रंग लावताना आणि रंगकाम पूर्ण झाल्यावर सर्वाधिक असली तरी पुढील अनेक वर्षे ते बाहेर पडत राहतात. किंबहुना पहिल्या वर्षात फक्त ५० टक्के व्हीओसीच बाहेर पडतात.

हे सगळे वर्णन भीतीदायक असले तरी नेरोलॅककडे यावर उपाययोजना आहे. २०११ साली नेरोलॅक हे या क्षेत्रातील उद्गाते ठरले आणि त्यांची प्रिमिअम इंटिरिअर आणि एक्स्टिरिअल इमल्शनची संपूर्ण रेंज जवळपास शून्य व्हीओसी केली आणि त्यांच्या इंटिरिअर व एक्स्टिरिअर इमल्शन्सची लोकप्रिय रेंज कमी व्हीओसी असलेली केली. असे करणारी ही भारतातील पहिलीच कंपनी होती. व्हीओसीची पातळी कमी असल्यामुळे नेरोलॅकचे रंग घरी वापरण्यासाठी सुरक्षित आहेत आणि नेरोलॅकच्या हेल्थी होम या तत्त्वाशी याची सांगड घातली गेली आहे.

SEND US YOUR QUERIES

तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा